औद्योगिक क्षेत्र भेट
पवार अलोक
औद्योगिक क्षेत्र भेट हा क्षेत्र भेटीचा एक प्रकार आहे. नेहमीच्या क्षेत्र भेटीपेक्षा औद्योगिक क्षेत्र भेट करणे हा तितकाच किचकट असूनही एक महत्वाचा प्रकार म्हणून समोर येतो. विद्यार्थी जेंव्हा शिकत असतो तेंव्हा औद्योगिक भेट घेणे हे त्याच्या विद्यार्थी दशेला अगदीच पोषक असते. आपण काय शिक्षण घेतो आहे आणि त्या शिक्षणाला अनुसरून या उद्योगजगतामध्ये नक्की कोणत्या गोष्टी घडत आहेत, आपल्या शिक्षणाला अनुसरून ते नक्की आहे का याची बांधणी विद्यार्थी करीत असतो, त्यामुळे या औद्योगिक क्षेत्र भेटी या अतिशय महत्वाच्या असतात. विद्यार्थ्यांनी या भेटींमध्ये अगदी चोखंदळपणे निरीक्षणाची भूमिका बजावायची असते. औद्योगिक भेट ही गटाला अनुसरून आखली जाते. त्यामध्ये वैयक्तिक विशेषीकरण लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे आपल्या विशेषीकरणाला अनुसरून आहे ती औद्यीगिक भेट ही कशी साकारता येईल याकडे विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष द्यावयाचे असते.
औद्योगिक क्षेत्र भेटी देताना आपण या भेटीचे तयारीसाठी तीन टप्पे करणे अनिवार्य आहे.
(१) पूर्वतयारीचा टप्पा
(२) भेटीचा टप्पा
(३) अंतिम टप्पा
सर्वात सुरवातीला आपल्याला पूर्वतयारीचा टप्पा समजावून घ्यावयाचा आहे.
(१) पूर्वतयारीचा टप्पा
ज्यावेळी आपल्याला क्षेत्र भेट करावयाची आहे त्याआधीचा नियोजनाचा टप्पा म्हणजेच पूर्वतयारीचा टप्पा. जर हे नियोजन व्यवस्थित झाले तर आणि तरच आपली क्षेत्रभेट व्यवस्थित होणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या नियोजनासाठी आपल्याला क्षेत्रभेटीसाठीचे व्यवस्थापन ज्या व्यक्तीकडे असेल त्यांच्याकडून संपूर्ण माहिती नीट व्यवस्थित घेऊन ही क्षेत्राभेट साकारली पाहिजे. ज्या औद्योगिक उद्योगासंस्थेमध्ये जावयाचे आहे त्या संस्थेशी योग्य पत्रव्यवहार करून भेटले पाहिजे. काही वेळेस हे सर्व कामे व्यवस्थापन पार पाडते. क्षेत्राभेतीसाठी अनुकूल दिवस आणि वेळ ठरला कि त्याआधी भेट देणाऱ्या सर्वांची एक बैठक होणे अतिशय आवश्यक असते. आणि त्या बैठकीला अनुसरूनच बैठकीतील उपस्थितांनी ही भेट देणे अनुकूल ठरते. उद्योगसंस्थांकडून काही मार्गदर्शक सूचना सांगितल्या जातात, त्या मार्गदर्शक सूचना बैठकीत सांगितल्या जातात, त्यामुळे त्याचे अनुपालन नाही झाले तर ते थोडे अहितकारी ठरते. त्यामुळे हे अतिशय महत्वाचे आहे.
ड्रेसकोड :
ड्रेसकोड हा व्यवस्थित असणे हे अतिशय महत्वाचे असते. शक्यतो हे करताना यामध्ये एकसारखेपणा असणे फार गरजेचे आहे. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी शक्य झाल्यास एकसारख्या रंगाचे कपडे घालणे हे केल्यास त्यामध्ये सुसंगतता येते. त्यामुळे ठरवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रत्येकाच्या उपलब्धतेनुसार पांढऱ्या रंगाचा सदरा आणि काळ्या रंगाची किंवा निळ्या रंगाची विजार घालणे. विद्यार्थ्यांनी देखील याच रंगात आपला पोशाख राहील याची काळजी घ्यावी. जर विद्यार्थिनींना हे शक्य नसेल तर सर्वच विद्यार्थ्यांनी यांनी एकाच प्रकारचा पंजाबी सूट परिधान करावा. यामध्ये अधिक घेरदार कपडे घातले जाणार नाहीत याची जवाबदारी घ्यावी.
विद्यार्थ्यांनी शर्ट हा व्यवस्थित इन करणे गरजेचे आहे. तसेच बेल्टचा वापर देखील करणे गरजेचे आहे. पायामध्ये शक्यतो चप्पल किंवा सॅडल वापर टाळणे. काही कंपन्यांमध्ये जर त्या कंपन्या खाद्यपदार्थ बनवीत असतील तर त्या ठिकाणी पायात काहीही घालणे योग्य ठरत नाही. या ठिकाणी त्या कंपनीच्या कडून जर काही चपला घालण्यास मिळाली तर त्या पद्धतीने हा बदल आवश्यक आहे. काही कंपन्या जिथे वस्तुनिर्मिती होत असते त्या ठिकाणी चप्पल किंवा सॅडल घातले तर ते इजा पोहोचविणारे देखील होऊ शकते त्यामुळे तेथे बुटांचाच वापर करावा. काही कंपन्यांकडून हे औद्योगिक शूज देखील उपलब्ध करून दिले जातात. विद्यार्थ्यांनी जर पंजाबी सूट घातला असेल तर त्याला व्यवस्थित पणे पिनअप केले पाहिजे. वेळोवेळी ओढणीला हात लावणे व तिला सावरणे हे योग्य वाटत नाहीत. ज्या विद्यार्थ्यांचे केस मोठे असतील त्यांनी त्याला पोनीटेल येईल या दृष्टीकोनातून बांधले पाहिजेत. केस मोकळे सोडणे हे वस्तुनिर्मिती किंवा खासकरून ज्या कंपन्यांमध्ये पदार्थ बनविले जातात तेथे स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून फायदेशीर ठरत नाही. नखे देखील व्यवस्थित कापली पाहिजेत. उग्र असा सेंट वापरू नये.
कोणत्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू उद्योग संस्थेत जाताना घालून जाऊ नये.
आयकार्ड
सर्व विद्यार्थ्यांनी आपण एकाच संस्थेशी संलग्नित आहोत हे दाखविण्यासाठी आयकार्ड चा वापर करणे अतिशय महत्वाचे आहे. उद्योग संस्थेतील व्यक्तींना मागणीनुसार हे आयकार्ड दाखविणे आवश्यक आहे.
नियोजन
नियोजन हे अतिशय महत्वाचे असते. आपल्याला कोणत्या उद्योग संस्थेत जायचे आहे हे आधीच कळले असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी बैठकीमध्ये व्यवस्थापकांकडून त्या संस्थेबद्दलची माहिती आपल्याला मिळते. त्या संस्थेची संघटना कशी आहे, त्या संस्थेमध्ये कोणती उत्पादने निर्माण होतात, त्या उत्पादनाचे वैशिष्ठ काय आहे? या सर्व गोष्टींची माहिती प्रत्येकांने आधी मिळू शकते का याकडे अधिकाधिक लक्ष द्यावे. यासाठी Google चा वापर करणे हे अतिशय सुलभ राहील. Google च्या मदतीने कंपनी नक्की कोठे आहे, कंपनीमार्फत कोणती उत्पादने निर्मित होतात. कंपनीचे संघटन कसे आहे, या सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला मिळते.
काही प्रश्नावली आपण कंपनीमध्ये विचारायची असेल तर आधीच आपल्याला मिळालेल्या माहितीमधून बनविणे हे देखील महत्वाचे आहे. हे प्रश्न शक्यतो सोपे साधे असावे. व प्रश्नांमध्ये लवचिकता असावी. म्हणजे काही प्रश्न आपण समयसूचकतेने विचारणार आहोत किंवा काही प्रश्न टाळणार देखील आहोत. प्रश्नावली ही शक्यतो बहुपर्यायी विचारणे योग्य राहील. ज्यामध्ये "हो - नाही", '"चूक - बरोबर" अशी उत्तरे मिळतील अशीच अपेक्षा असावी. जेंव्हा प्रश्नावली निर्माण होईल तेंव्हा ती प्रश्नावली आपल्या मार्गदर्शकांना दाखवून तपासून घेणे. जेणे करून एखादा प्रश्न वाढवता येणे तसेच चुकीचा प्रश्न काढून टाकणे हे सहज शक्य होते. आपण जेंव्हा कंपनीमध्ये जाऊ तेंव्हा आपल्याला सर्वच गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे, त्यामुळे एखाद्या या भेटीत अन्य व्यक्तीने प्रश्न विचारला असता आपण तोच प्रश्न पुन्हा विचारू नये याचे भान देखील आपण ठेवले पाहिजे.
(२) भेटीचा टप्पा
क्षेत्र भेट देताना भेटीचा टप्पा हा अतिशय महत्वाचा असतो. भेट देताना प्रत्येक विद्यार्थ्याने काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या दिवशी ठरल्याप्रमाणे ड्रेसकोड घालून आवरून वेळेवर एका ठिकाणी जेथून भेटीसाठी प्रस्थान होणार आहे तेथे जमले पाहिजे. शक्यतो वेळेच्या आधीच पोहोचणे कधीही चांगले. त्याठिकाणी ज्या सूचना दिल्या जातात, त्यांचे अनुपालन देखील केले पाहिजे.
प्रत्येकाने स्वत:कडे स्वतःचे वही (शक्यतो नोटपॅड) पेन, पेन्सील या गोष्टी देखील घ्याव्यात. ज्यावेळी आपण कंपनीला भेट देणार आहोत. त्यावेळी आपल्याला तेथून मिळणारी प्रत्येक माहिती लिहून घेणार आहोत. आपल्याकडे स्वतःचा मोबाइल फोन देखील घ्यावयाचे आहेत. ज्याचा उपयोग आपल्याला फोटो काढण्यासाठी होणार आहे. मात्र काही कंपन्यांमध्ये काही ठराविक ठिकाणी फोटो काढण्याची परवानगी नसते. मात्र आपण कंपनीमध्ये व्यवस्थापकांना विचारून फोटो काढू शकता. अंतिम उत्पादनांचे फोटो काढता येतील का या गोष्टी पहाव्यात. मात्र जर फोटो काढण्यास परवानगी दिली नाही तर अजिबात फोटो काढू नये. शक्यतो मोबाईल पूर्ण वेळ म्युट ठेवणे.
कंपनीचे विभाग कसे विस्तारित झाले आहेत, याचे चित्रण देखील काढले गेले पाहिजे. सुरवातीला हे कच्चे टिपण करून अहवालात ते पुन्हा लिहिणे सोप्पे जाते.
भेट देताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्यामध्ये निरीक्षण हे अतिशय महत्वाचे आहे. जसे की ज्या गोष्टी निरीक्षणाने सध्या होतात, त्या बद्दल आपण पुन्हा प्रश्नांची पुनरावृत्ती करणे हे टाळले पाहिजे. उदाहरणार्थ : एखाद्या कंपनीमध्ये काही वेल्डिंग करणारे लोक हे आपल्याला डोळ्यावर काळा चष्मा घालून दिसत आहेत, किंवा एखाद्या पदार्थ बनविण्याच्या कंपनीमध्ये आपल्याला लोक चपला त्या क्षेत्रात घालून येताना दिसत नाहीत, किंवा डोळ्यावरील केस हे संपूर्णपणे कव्हर केलेले दिसत असूनही त्यांना आपण तुम्ही सेफ्टी मेजर काय घेता हे विचारणे चुकीचे ठरते. या ठिकाणी आपल्याला निरीक्षणे उतरविण्याची कला देखील आली पाहिजे, हे म्हणावयास हरकत नाही. निरीक्षणामधून ज्या गोष्टी सहज कळत नाहीत त्याबबातील प्रश्न विचारणे नेहमीच चांगले. मात्र प्रश्न विचारताना ते प्रश्न खोचक वाटतील हे देखील चुकीचे. काही प्रश्न विचारताना काही तारतम्य बाळगणे कधीही चांगले. म्हणजे आपण कंपनीचा टर्नओव्हर किती, मग कच्चा माल विकून किती पैसे शिल्लक राहतात. कामगारांना किती पगार देतात, असे प्रश्न विचारू नये. या प्रश्नाच्या ऐवजी खालील काही ठराविक प्रश्नाची उत्तरे निरीक्षण आणि प्रश्नावली यांच्या आधारे घेता येतील का हे पाहावे.
(१) कंपनीची स्थापना
(२) कंपनीतील कर्मचारी हे वर्गीकरण केल्यास शिक्षित - अशिक्षित, कुशल - अकुशल, प्रशिक्षित - अप्रशिक्षित अशा कोणत्या गटात मोडतात.
(३) कंपनीचे संघटन कसे आहे?
(४) कंपनीच्या किती शाखा आहेत?
(५) कंपनीच्या मार्फत किती उत्पादने निर्माण होतात?
विपणन अभ्यासासाठी
(६) आपल्याद्वारे जी उत्पादने आहेत त्यांचे विपणन कसे होते?
(७) विपणन आपली संस्थाच करते का अन्य विपणन संघटनेकडे सदर जवाबदारी दिली गेली आहे?
(८) विपणनासाठी कोणती प्रमुख साधने आहेत?
(९) ग्राहकांच्या प्रतिक्रिया कशा घेतल्या जातात?
(१०) उत्पादनानामध्ये बदल कशा पद्धतीने केले जातात?
(११) ग्राहक आपल्यासाठी महत्वाचे आहेत तेंव्हा त्यांना समोर धरून कोणत्या संकल्पना निर्माण केल्या जातात?
(१२) आपल्या संस्थेकडून निर्माण केलेले उत्पादन किंवा सेवा हे एकसारखे राहतील त्यांच्या क्वालिटीमध्ये बदल होणार नाही यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?
मनुष्यबळ अभ्यासासाठी
(१३) कर्मचारी नेमताना काय लक्षात घेतले जाते?
(१४) कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाते का? त्याचे स्वरूप काय असते?
(१५) कर्मचारी टिकून राहतील यासाठी काही उपाययोजना आहेत का?
(१६) कर्मचाऱ्यांमध्ये चांगल्या गोष्टी रुजाव्यात यासाठी कोणकोणते प्रयत्न केले जातात?
(१७) कर्मचाऱ्यांना काही फायदेशीर लाभ भेटणाऱ्या सोई केल्या आहेत का?
(१८) कर्मचारी यांच्यामध्ये स्त्री पुरुष अशी आकडेवारी कशी आहे? स्त्रियांसाठी काही सोई केल्या आहेत का?
उत्पादन निर्मिती अभ्यासासाठी
(१९) कच्चा माल कोठून खरेदी केला जातो?
(२०) कच्चा माल खरेदी करण्यासाठी नक्की गुणवत्ता योजना कोणत्या?
(२१) नवीन बदल आपण कसे स्वीकारतो?
(२२) उत्पादनांचे पॅकेजिंग कसे असते?
(२३) उत्पादनाची गुणवत्ता कशी ठरवली जाते?
(२४) कंपनी मध्ये असणारी जी मशिनरी आहे तिची डागडुजी कशी केली जाते?
वित्त अभ्यासासाठी
(२५) कंपनीसाठी दरवर्षी मान्यताप्राप्त लेखापालाकडून ऑडीट होते का?
(२६) कंपनीचा अंदाजे दरवर्षीचा टर्न ओव्हर किती?
(२७) कंपनीला नेहमीच आर्थिक फायदा होते असेच चित्रण आहे का? आर्थिक नुकसान होते का?
(२८) आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कंपनी काय करते?
वरील प्रश्न हे उदाहरण म्हणून आहेत. यामध्ये काही बदल करून किंवा अन्य प्रश्न कंपनीच्या विशेषीकरणाद्वारे विचारू शकतात.
साधारण भेट संपन्न झाल्यावर सर्वांनी एकत्र येऊन फोटो काढावा जेणे करून सदर फोटो अहवालात वापरता येईल. फोटोसाठी कंपनीच्या बाहेरील जिथे कंपनीचे नाव ठळक दिसेल अशा ठिकाणी कंपनीमधील तज्ञ व्यक्ती, आपल्याबरोबरचे नियोजक आणि सर्व विद्यार्थी यांचे फोटो एकत्र काढावेत.
(३) अंतिम टप्पा
भेट संपन्न झाल्यावर अंतिम टप्पा म्हणजे भेटीचा अहवाल लिहिणे. भेटीचा अहवाल लिहिता येणे दे देखील एक प्रकारचे कौष्यल्याचे काम आहे. आपण ज्या प्रकारे अहवाल लिहिणार आहोत तो वाचणाऱ्याला दर्शवितो की, आपण नक्की या भेटीत काय बघितले, काय अनुभवले. हा अनुभव शब्दात मांडणे महत्वाचे आहे.
पहिले / सुरवातीचे पान नमुना
श्री स्वराज एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे
स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्यूटर स्टडीज
धनकवडी, पुणे
औद्योगिक क्षेत्र भेट
"<कंपनीचे नाव>"
<विद्यार्थ्याचे नाव>
<वर्ग>
मार्गदर्शकाचे नाव
<येथे मार्गदर्शकाचे नाव टाकणे>
<येथे मार्गदर्शकाचे पद व शिक्षण टाकणे>
शैक्षणिक वर्ष २० - २०
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका ही आपण एकंदरीत अहवाल लिहिताने जे मुद्दे लक्षात घेतले आहेत, त्याला अनुसरून तयार करणे अपेक्षित आहे. अहवालाच्या प्रत्येक पानावर पान क्रमांक देऊन तो क्रमांक अनुक्रमणिकेतील मुद्द्यासमोर असणे गरजेचे आहे.
ऋणनिर्देश
आपल्याला हा औद्योगिक क्षेत्र भेट अहवाल लिहिताना बऱ्याच जणांनी मदत केली असेल, ज्यामध्ये तुमचे शिक्षक, ज्यांनी ही भेट आयोजन केली किंवा ज्या ठिकाणी भेट दिली तेथील सदस्यांनी देखील तुम्हाला मार्गदर्शन केले असेल तर त्यांचे आभार मानण्याचे हे पान. त्यांनी कशाप्रकारे मदत केली हे सांगून हे इत्यंभूत सांगून त्याप्रकारे त्यांना ऋणनिर्देश देणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
प्रस्तावना
या भागात आपण सदर औद्योगिक भेट का दिली याची प्रस्तावना करणे गरजेचे आहे. प्रस्तावनेमध्ये भेटीबाबत मांडणी करणे गरजेचे आहे. भेट कोणत्या कंपनी / उद्योग संस्थेला दिली गेली. अगदी थोडक्यात त्या कंपनीची उत्पादने लिहिणे. कंपनीच्या भेटीची तारीख व वेळ देखील मांडणे हे देखील गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेटीतील सर्वांचा एकत्रित असलेला फोटो टाकणे.
उद्दिष्टे
या औद्योगिक भेटीचे कारण काय? त्यामागची उद्दिष्टे या ठिकाणी मांडणे आवश्यक आहे. ही सर्व उद्दिष्टे एक एक करून मांडणे. निदान चार ते पाच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ही भेट साध्य होणे अतिआवश्यक आहे.
कंपनीची ओळख
(१) कंपनीचे नाव :
पत्ता, दूरध्वनी क्र. आणि इमेल
(२) कंपनीचे स्थापना वर्ष
(३) मालकाचे नाव :
(४) एकूण उत्पादने :
(५) उत्पादनांची नावे : (यासाठी विद्यार्थी google ची मदत घेऊ शकतात.)
<<उत्पादनांचा फोटो असल्यास>>
(६) कंपनीचा प्रकार
(७) कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या :
(८) कंपनीतील स्त्री - पुरुष कर्मचाऱ्यांचे प्रमाण
(९) कंपनीचा लोगो : (यासाठी विद्यार्थी google ची मदत घेऊ शकतात.)
(१०) कंपनीच्या लोगोविषयी माहिती : <<लोगोच्या माध्यमातून नक्की काय समजते>>
(११) कंपनीचे दृष्टी (VISION)
कंपनीच्या उत्पादनांच्या विषयी माहिती
कंपनीचे SWOT विश्लेषण
(S Strength: ताकद, W Weakness: कमतरता O Opportunity संधी T Threats धोके )
<<विस्तारित स्वरुपात लिहिणे>>
कंपनीबाबत आपण पाहिलेल्या चांगल्या बाबी
निष्कर्ष : आपण जी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून भेट दिली त्याच्या पुर्ततेबद्दल या ठिकाणी लिहिणे महत्वाचे आहे.
Industrial Area Visit
Pawar Alok
An industrial area visit is a type of area visit. Visiting an industrial area is just as complicated as a regular field visit, but it is one of the most important. An industrial visit while a student is studying is very conducive to his student status. Students are building on what they are learning and what exactly is happening in the industry according to that education, according to their education, so these industrial area visits are very important. Students are required to play an observational role in these visits. The industrial visit is arranged according to the group. It does not take into account personal specialization. Therefore, students need to pay special attention to how the industrial gift that is in line with their specialization can be realized.
When visiting an industrial area, you must go through three steps to prepare for this visit.
(1) Preparatory stage
(2) Visiting stage
(3) The final stage
First of all, we want to understand the preparation phase.
(1) Preparatory stage
The pre-planning stage is the pre-preparation stage when you want to visit the area. It is important to note that if this planning is done properly and only then will your field visit be organized. For this planning, you need to get the complete information from the person who will arrange the field trip for the field trip. Appropriate correspondence should be met with the industrial enterprise to which you want to go. At some point, management manages all these tasks. It is very important to have a meeting of all the visitors before the favorable day and time for a field visit. And according to that meeting, it is favorable for the attendees to make this visit. Some guidelines are given by the industry, those guidelines are given in the meeting, so if it is not complied with, it becomes a little unhealthy. So this is very important.
Dresscode:
It is very important that the dress code is in order. In doing so, it is important to have consistency. This means that if it is possible for all the students to wear clothes of the same color, it will be consistent. Therefore, college students decide to wear white shirts and black or blue pants according to their availability. Students should also make sure that their dress stays in the same color. If this is not possible for the students, then all the students should wear the same type of Punjabi suit. Care should be taken to ensure that no more elaborate clothing is worn.
Students need to wear the shirt properly. It is also important to use a belt. Avoid using slippers or saddles on the foot if possible. In some companies, if those companies are making food, then it is not appropriate to put anything on the feet in that place. If you can get some slippers from that company at this place, then this method needs to be changed. Some companies wear slippers or saddles in the place where the product is made, which can be harmful, so use only shoes there. These industrial shoes are also made available by some companies. If the student is wearing a Punjabi suit, it should be properly pinned up. It is not advisable to touch the cloth from time to time and fix it. Students who have long hair should tie it with a ponytail. Leaving the hair loose is not beneficial from a hygienic point of view in manufacturing or especially in companies where products are made. Nails should also be trimmed properly. Don't use harsh scents.
Valuables of any kind should not be worn while going to an industry organization.
Identity Card
It is very important for all students to use Identity Card to show that they belong to the same organization. Individuals in industry organizations are required to show this iCard on demand.
Planning
Planning is very important. If you already know which industry organization you want to go to, then each student gets information about that organization from the managers in the meeting. What is the organization of that organization, what products are made in that organization, what is the feature of that product? More and more attention should be paid to whether everyone can get the information of all these things first. It will be very easy to use Google for this. With Google's help, where exactly is the company, what products are produced by the company? You get to know all about the organization of the company.
If you want to ask a question to the company, it is important to build on the information you already have. These questions should be as simple as possible. And questions should have flexibility. This means that we will ask some questions in a timely manner or we will avoid some questions. The questionnaire will probably be a multiple-choice question. Expect answers like "yes-no", "wrong - right". When the questionnaire is created, show it to your guide and check it. So that it is easy to raise a question and also to remove the wrong question. You have to pay attention to everything when you go to the company, so you should also keep in mind that you should not ask the same question again if another person has asked a question during this visit.
(2) Visiting stage
The visitation phase is very important when visiting the area. There are some important things to keep in mind while visiting. Put on a dress code as planned on that day and wrap up in a timely manner at a place where you will be leaving for a visit. It is always best to arrive prematurely. The instructions that are given there should also be followed.
Everyone should take their own notebook (preferably notepad) pen and pencil with them. When we are going to visit the company. At that time we are going to write down every piece of information we get from there. You also want to have your own mobile phone. Which you are going to use to take photos. However, some companies do not allow photography in certain places. But you can take a photo by asking the managers in the company. It remains to be seen whether the final product will be photographed. However, if you are not allowed to take photos, you should not take photos at all. Preferably keep the mobile muted full time.
A depiction of how the company's departments have expanded should also be drawn. It is easy to rewrite the report by making a raw note at the beginning.
There are a few things to keep in mind when visiting. In which observation is very important. For example, we should avoid repeating questions about things that are currently happening under observation. For example, you see some welding people in a company wearing goggles over your eyes, or you see people in a manufacturing company wearing slippers in that area, or you ask them what safety measure you take even though the hair on the eyes seems to be completely covered. Turns out to be wrong. It is safe to say that this is where the art of observation comes in. It is always good to ask questions about things that are not easy to understand from observation. But it is also wrong to think that the questions will be sharp when asked. It is always best to make some distinctions when asking questions. That is how much turnover you have for the company, then how much money you have left after selling the raw material. The question should not be asked how much the workers are paid. Instead of this question, see if the answers to the following specific questions can be taken on the basis of observation and questionnaire.
(1) Establishment of the company
(2) The employees of the company fall into the category of educated-uneducated, skilled-unskilled, trained-untrained.
(3) How is the organization of the company?
(4) How many branches does the company have?
(5) How many products are produced by the company?
For marketing studies
(6) How do you market the products you have?
(7) Marketing is done by your organization. Has this responsibility been given to another marketing organization?
(8) What are the major marketing tools?
(9) How is customer feedback taken?
(10) How are product changes made?
(11) When customers are important to you, what concepts are created with them in mind?
(12) What efforts are made to ensure that the products or services produced by your organization remain the same without any change in their quality?
For Human Resource study
(13) What is taken into consideration while hiring employees?
(14) Is training given to employees? What does it look like?
(15) Are there any measures for the survival of the employees?
(16) What efforts are made to inculcate good things in the employees?
(17) Are there any benefits available to the employees?
(18) What is the statistic of males and females among the employees? Are there any facilities for women?
For product manufacturing studies
(19) Where is the raw material procured?
(20) What exactly are the quality schemes for purchasing raw materials?
(21) How do we accept new changes?
(22) How are the products packaged?
(23) How is product quality determined?
(24) How is the machinery in the company repaired?
For the study of finance
(25) Is the company audited every year by an accredited accountant?
(26) What is the approximate annual turnover of the company?
(27) Is the company always portrayed as having financial benefits? Is there a financial loss?
(28) What does the company do to avoid financial loss?
The above questions are examples. By making some changes in this or other questions can be asked through the specialization of the company.
After a simple visit, everyone should come together and take a photo so that the photo can be used in the report. For a photo outside the company where the name of the company will be prominently displayed, the company experts, your fellow planners, and all the students should be photographed together.
(3) The final stage
The final step after the visit is to write a visit report. Being able to write an appointment report is also a kind of skill. The way we write the report shows the reader exactly what we saw and experienced during the visit. It is important to put this experience into words.
First / starting page template
Shri Swaraj Education Society, Pune
Swaraj College of Commerce and Computer Studies
Dhankawadi, Pune
Industrial Area Visit
"<Company name>"
<Student name>
<Class>
Under Guidance
<Enter the name of the guide here>
<Post and Designation of guide here>
Academic Year 20 - 20
Index
The index is expected to be based on the points you have made in writing the report as a whole. Each page of the report must be numbered in front of the point in the index by giving a page number.
Acknowledgment
If you have been helped by many in writing this Industrial Area Visit Report, thank you to your teachers, who organized the visit, or the members of the place you visited. It is very important to tell them how they helped and to give them credit in that way.
Preface
It is necessary to introduce why you gave this industrial gift in this area. The preamble needs to be set out in the preamble. Which company/industry organization was given the gift? To write briefly about the products of that company. It is also important to state the date and time of the company's visit.
Students post a photo of everyone they meet at this place.
Objectives
What is the reason for this industrial visit? The objectives behind it must be stated here. Present all these objectives one by one. It is imperative to achieve this goal with at least four to five objectives in mind.
Company identity
(1) Company Name:
Address, Telephone No. And email
(2) Year of the establishment of the company
(3) Owner's Name:
(4) Total products:
(5) Product names: (Students can use google for this.)
<< If there is a photo of the product >>
(6) Type of company
(7) Total number of employees in the company:
(8) Proportion of male and female employees in the company
(9) Company logo: (Students can use Google for this.)
(10) Information about the company logo: << What exactly is understood through the logo >>
(11) VISION OF COMPANY
Information about the company's products
SWOT analysis of the company
(S Strength, W Weakness, O Opportunity, T Threats)
<< Writing in Extended Format >>
Good things about the company
Conclusion: It is important to write here about the fulfillment of the objectives you have set before you.